Join us

वर्सोवा पोलीस ठाण्यातील मृत्यूप्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: November 1, 2014 01:18 IST

वर्सोवा पोलीस ठाण्यात मारहाणप्रकरणी अटक आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तक्रारदार वॉचमनसह तिघांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : वर्सोवा पोलीस ठाण्यात मारहाणप्रकरणी अटक आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तक्रारदार वॉचमनसह तिघांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. वॉचमन शीतल कामत, सत्यप्रकाश वैद्य, संतोष कामत अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. 
  गोदीरामला या तिघा आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गोदीराम बाबूशहा शिवेकर (38) हा मृत व्यक्ती अंधेरी, सात बंगला, सागर कुटीर परिसरात राहत होता. तसेच त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो तेथील फुटपाथवर राहत होता. मंगळवारी दुपारी त्याचे त्याच परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करणा:या शीतल कामत याच्याशी भांडण झाले. या वादात कामतनेच त्याला मारहाण केली  तसेच त्याच्यासोबत असलेल्या वैद्य व संतोष यानेही त्याला मारहाण केली.गोदीरामने कामतचा चावा घेतल्याने कामतने तक्रार दिली असता गोदीरामला वर्सोवा पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी मध्यरात्री गोदीरामची प्रकृती बिघडल्याने त्याला कूपर रुग्णलयात प्राथमिक उपचार करून परत लॉकअपमध्ये आणले. मात्र सकाळी सहा वाजता त्याची प्रकृती परत खालावली. त्याला कूपर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता या तिघांनी केलेल्या मारहाणीत त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे बुधवारी सकाळी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)