Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालवणीतील तिहेरी हत्याकांडप्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: June 25, 2016 23:40 IST

मालवणीतील तिहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी मालवणीत एका वयस्कर महिलेची आणि तिच्या दोन नातवंडाची हत्या करण्यात आली होती.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २४ - मालवणीतील तिहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

दोन दिवसांपूर्वी मालवणीत एका वयस्कर महिलेची आणि तिच्या दोन नातवंडाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी क्राईम ब्रांचच्या युनिट 11 च्या पोलिसांनी तिघा मारेक-यांना आज उशिरा गुजरातमधील वलसाड येथूल अटक केली आहे.

सलमान शेख व त्याची पत्नी अनाम शेख आणि इम्रान अशी या तिघांची नावे आहेत. त्यांनी तिहेरी हत्याकांडाची पोलिसांना कबुली दिली आहे. आर्थिक वादातूनच या तिघांनी बबली शॉ या महिलेची आणि तिच्या दोन्ही नातवंडाची हत्या केल्याचे पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले आहे. या तिघांना उद्या मालवणी पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. तसेच, यासंदर्भात उद्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.