मुंबई : मोटरकार चालकाला शस्त्राचा धाक दाखवत लुबाडणाऱ्या तिघांना विक्रोळी पोलिसांनी शनिवारी अटक केली. आरोपींमध्ये एका किन्नराचा समावेश असून, तो मुख्य आरोपी असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.विक्रोळी परिसरात काही दिवसांपूर्वी एक कार अडवून चालकाला शस्त्राचा धाक दाखवत लुबाडण्यात आले. त्याच्याकडून जवळपास ४२ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. त्यानुसार या प्रकरणी चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानुसार या विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त तावडे आणि विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार, सोनावणे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सांडभोर आणि पथकाने तपास करीत तिघांच्या मुसक्या आवळल्या.तसेच चोरीला गेलेला ४२ हजारांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात त्यांना यश मिळाले. आरोपींकडून एक मोबाइल आणि गुन्ह्यासाठी वापरलेली गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे.
दरोड्याप्रकरणी किन्नरासह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 02:11 IST