Join us

विकासकाला जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:07 IST

विकासकाला जीवे मारण्याची धमकीतिघांना जोगेश्वरीमध्ये अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कंत्राट मिळविण्यासाठी विकासकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ...

विकासकाला जीवे मारण्याची धमकी

तिघांना जोगेश्वरीमध्ये अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कंत्राट मिळविण्यासाठी विकासकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांना मंगळवारी मेघवाडी पोलिसांनी अटक केली.

अंधेरीच्या महाकाली गुंफा परिसरातील २२ मजली इमारतीचे काम विकासक भावेश एस. (३९) यांच्याकडून अमर पाटील, सुरेश पाटील आणि युवराज जाधव हे तिघे मागत होते. ज्याला भावेशने विरोध केला. त्यानंतर त्यांच्या कामगारांनी संबंधित ठिकाणी खड्डा खोदण्यास सुरुवात केली. तेव्हा अमरचे दोन साथीदार त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी कामगारांना धमकावण्यास सुरुवात केली. तसेच त्यांचा बॉस अमर याच्या परवानगीशिवाय काम करू देणार नसल्याचे सागितले. भावेश आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार भावेश यांनी पोलिसात तक्रार दाखल करताच पोलिसांनी तपासाअंती तिघांना अटक केली.

...........................