Join us

नोकरीच्या आशेने हजारो तरूणांची पायपीट

By admin | Updated: September 15, 2014 23:11 IST

मोखाडा, जव्हार, विक्रमगड, तलासरी या अनुसूचीत क्षेत्रतील हजारो तरूण-तरूणींनी पालघर कार्यालयात एकच गर्दी केली होती.

पालघर : पालघर जिल्हापरिषदेमध्ये नोकर भरती प्रक्रिया सुरू असल्याचे काही आदिवासी संघटनांकडून सांगण्यात आल्याने मोखाडा, जव्हार, विक्रमगड, तलासरी या अनुसूचीत क्षेत्रतील हजारो तरूण-तरूणींनी पालघर कार्यालयात एकच गर्दी केली होती. परंतु जि. प. कडून कुठल्याही प्रकारच्या जागांसाठी अर्ज स्वीकारणो प्रक्रिया सुरू नसून काही संघटनांच्या मागणीवरून आम्ही फक्त अर्ज स्वीकारणो काम सुरू ठेवल्याचे सांगितले. यामुळे शेकडो कि. मी. ची पायपीट करीत नोकरीच्या अपेक्षेने आलेल्या तरूणांचा भ्रमनिरास होणार आहे.
राज्यपालांच्या अध्यादेशानुसार अनुसूचीत क्षेत्रतील स्थानिक उमेदवारासाठी आरक्षीत पदासाठी नोकर भरती करताना अध्यादेशाचे काटेकोरपणो पालन करून स्थानिकांना नोकर भरती प्रक्रियेत सामावून घेणो बंधनकारक असताना 25 जुलै 2क्14 रोजी नवनियुक्त शिक्षण सेवक भरती प्रक्रियेत 283 उमेदवाराची भरती करताना स्थानिक उमेदवाराना डावलण्यात आल्याने ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी आदिवासी एकता परिषदेने केली होती. तसेच पेसा कायद्यांतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रतील नोकरभरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी मोर्चाचे आयोजनही केले होते. यादरम्यान काही संघटनांच्या पदाधिका:यांनी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिका:यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मोर्चेक:यांना आश्वासित केले होते. त्यानंतर काही संघटनांनी जि. प. मध्ये अर्ज सादर करण्याची माहिती दिल्यानंतर शुक्रवार पासून जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, तलासरी, डहाणू, पालघर इ. भागातुन एक ते दीड हजार तरूण-तरूणींनी पालघर जि. प. कार्यालयात रांगा लावल्या आहेत.
नोकरीच्या आशेने मोखाडा, जव्हार इ. 9क् ते 1क्क् कि. मी च्या प्रवासासह 3क्क् ते 4क्क् रू. चा खर्च करून हजारो तरूणांनी पालघर जि. प. कार्यालय गाठले असून वैयक्तीक माहितीच्या आधारे शैक्षणिक पात्रता,खेळातील प्रमाणपत्र, संगणक प्रशिक्षण पत्र, टायपींग प्रमाणपत्र इ. चा बंच जोडून त्यावर एक फोटो अशी वैयक्तीक माहिती जिल्हा परिषद कार्यालयात जमा करण्याचे काम सुरू आहे. परंतु जि. प. मध्ये अथवा पालघर जिल्ह्यातील कुठल्याही विभागातून नोकर भरतीची प्रक्रिया सुरू नसताना या सर्व तरूणांना फॉर्म भरण्यासंदर्भात कुणी सांगितले? असा प्रश्न विचारला असता आमच्या संघटनांनी सांगितल्याचे काही तरूणांनी लोकमतला सांगितले. अशा चुकीच्या माहितीमुळे तरूणांच्या पदरी निराशा पडणार असली तरी या फॉर्मसाठी लागणारे विविध दाखल्याच्या झेरॉक्स पोटी झेरॉक्स दुकानदारांची मोठी कमाई झाली आहे. निवडणुकांच्या तोंडावर सर्व तरूणांना नोक:यांचे आमिष दाखवून आपला मताच्या स्वार्थ साधण्यासाठी तर एखादा राजकीय पक्ष अथवा संघटना तर या तरूणांच्या फायदा तर घेत नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. 
या संदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्याशी संपर्क साधला असता आचारसंहिता असल्याने सध्या जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची नोकर भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे सांगितले. (वार्ताहर)
 
अनुसूचीत क्षेत्रतील नोकर भरतीत स्थानिक उमेदवाराना नोकरीमध्ये समाविष्ट करा अशी आपली मागणी होती. मात्र फॉर्म दाखल करा असे आमच्या संघटनेने कुठेही सांगितलेले नाही.
- डॉ. सुनील प:हाड, 
ठाणो जिल्हा सचिव 
आदिवासी एकता परिषद