मुंबई : व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) परीक्षेच्या गुणदान पद्धतीमध्ये बदल करण्यात आल्याचा फटका हजारो विद्याथ्र्याना बसला आहे. मायनस गुणदान पद्धती सुरू केल्याची माहिती विद्याथ्र्याना न दिल्याने राज्यातील हजारो आयटीआयमधील विद्यार्थी नापास झाले आहेत.
यापूर्वी आयटीआयमध्ये एनआयएमआय ही परीक्षा पद्धत राबविण्यात येत होती. त्यानुसार दोन वर्षात एक फायनल परीक्षा घेण्यात येत असे. या पद्धतीमध्ये बदल करत 2क्13-14 पासून चुकीचे उत्तर लिहिल्यास मायनस गुणदान पद्धत राबविण्यास सुरुवात झाली. परंतु या परीक्षा पद्धतीची माहिती विद्याथ्र्याना देण्यात न आल्याने हजारो विद्यार्थी आयटीआयच्या परीक्षेत नापास झाले आहेत.
सेकंड सेमिस्टरची परीक्षा सुरू होण्यास एक आठवडा शिल्लक असताना विद्याथ्र्याना जुनी परीक्षा पद्धत रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच परीक्षेचे पेपर मायनस गुणदान पद्धतीने तपासले जातील, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. यामुळे आयटीआयमधील हजारो विद्यार्थी नापास झाले आहेत. याबाबत विद्याथ्र्यानी प्राचार्याकडे विचारणा केली असता त्यांनी विद्याथ्र्याशी बोलल्यास नकार दिल्याचे विद्याथ्र्यानी सांगितले. मायनस गुणदान पद्धतीनुसार घेण्यात आलेली परीक्षा रद्द करावी आणि विद्याथ्र्याच्या पेपरची फेरतपासणी करावी, अशी मागणी विद्याथ्र्यानी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)