कल्याण : कल्याण शहराच्या मुख्य पोस्ट ऑफिसात मासिक आय योजनेत (एमआयएस) पैसे ठेवलेल्या सात हजारांहून अधिक खातेदारांचे जून महिन्याचे व्याज त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही. जूनची व्याजाची रक्कम खिडकीवरून रोखीनेच दिली जाईल, असा हेका टपाल विभागाने धरल्याने वृद्ध खातेदारांना, आपलेच हक्काचे पैसे घेण्यासाठी, याचकाप्रमाणो तासनतास रांगेत उभे राहावे लागत
आहे.
आधुनिकीकरणाची कास धरलेल्या पोस्ट खात्याने आता आपल्या देशव्यापी व्यवहारांसाठी बँकांप्रमाणो ‘कोअर बँकिंग सोल्युशन्स’ (सीबीएस) यंत्रणोचा वापर सुरु केला आहे. मात्र संगणकीय जाळ्य़ात जुनी यंत्रणा काढून टाकून ‘सीबीएस’ सुस्थापित करण्यात अडचणी आल्याने ‘एमआयएस’चे जूनचे व्याज ‘ईसीएस’ने जमा होऊ शकले नाही, असे अधिकारी सांगत आहेत. हा गोंधळ संगणकीय बिघाडामुळे झाला असल्याने जूनच्या व्याजाची अशीच स्थिती इतरही अनेक शहरांत निर्माण झाली असण्याची
शक्यता आहे.
जूनचे व्याज ’ईसीएस’ने जमा
झालेले नाही किंवा होणार नाही याची माहिती देणारी नोटिस लावण्याची तसदीही पोस्टाने घेतली नाही. खातेदारांनी ठरलेल्या तारखेला आपल्या बँकेत व्याज जमा झाले की नाही हे पहावे आणि जमा झाले नाही हे कळल्यावर पोस्टातून ते रोखीने घेऊन जावे, अशी पोस्टाची निर्लज्ज अपेक्षा आहे. जूनचे व्याज रोखीने खिडकीवरून दिले जाणार आहे याचीही नोटिस न लावल्याने जूनचे व्याज कधी आणि कसे मिळणार याची साधी चौकशी करण्यासाठीही खातेदारांना रांगेत उभे राहावे लागत आहे.
आता 27 जूनपासून ‘ईसीएस’ची व्यवस्था पुन्हा सुरु झाली आहे. तेव्हा ज्यांनी जूनचे व्याज रोखीने घेतलेले नाही त्यांना ते जुलैच्या व्याजासोबत ’ईसीएस’ने देण्यात काय अडचण आहे, असे विचारले असता धड उत्तरे देण्याचे सौजन्यही कर्मचा:यांकडे नाही. ‘आम्हाला जीपीओ’तून जसे सांगण्यात आले तसे आम्ही करत आहोत. जूनचे व्याज हवे असेल तर ते रोखच मिळेल व त्यासाठी रांगेत उभे राहावेच लागेल. हे पसंत नसेल तर पोस्ट मास्तरच्या नावाने लेखी तक्रार करा, आम्ही ती वर पाठवून देऊ’, अशी उत्तरे खातेदारांना दिली जात आहेत. (प्रतिनिधी)
पोस्टाची दादागिरी
खातेदारांना जूनचे व्याज पोस्टाच्या चुकीमुळे महिना किंवा त्याहून उशिरा मिळत आहे. त्यामुळे खरे तर पोस्टाने या व्याजावर विलंबाच्या काळासाठी व्याज द्यायला हवे. पण हा विषय खातेदाराने काढला की जणू काही त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशा नजरेने त्याच्याकडे पाहून पोस्टाचे कर्मचारी त्याची बोळवण करतात.
च्‘एमआयएस’चे व्याज दरमहा रोखीने दिले जाते, अथवा खातेदाराच्या बँकेत ‘ईसीएस’ने थेट जमा केले जाते. सोय म्हणून बहुतांश खातेदार ‘ईसीएस’चा पर्याय निवडतात व पोस्ट खातेही व्याज तसेच घेण्याचा आग्रह करते. ज्यांना नियमित पेन्शन नाही अशा हजारो ज्येष्ठ नागरिकांना मासिक खर्च भागविण्यासाठी ‘ईसीएस’ने ठराविक तारखेला बँकेत जमा होणारे ‘एमआयएस’चे व्याज हाच एकमेव आधार असतो.
च्मात्र जूनचे व्याज जमा न झाल्याने आणि जुलैचे व्याज उशीर झाला तरी ‘ईसीएस’नेच मिळेल, असा पवित्र पोस्टाने घेतल्याने या खातेदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. पैशाची निकड असल्याने, तीन-चार तास रांगेत उभे राहण्याचा त्रस सोसून आणि पोस्टाच्या संवेदनाशून्य कारभराला शिव्याशाप देत, खातेदार जूनचे व्याज खिडकीवरून रोखीने घेत आहेत.