मुंबई : मानखुर्द-गोवंडी दरम्यान चालत्या लोकलमध्ये लोखंडी रॉडच्या हल्ल्यात भांडुप पोलीस ठाण्याच्या हर्षा जाधव जखमी झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर १६ टाके पडल्यानंतर पुढील उपचारासाठी शुक्रवारी खासगी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.हर्षा या मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे पतीसोबत राहण्यास आहेत. गेल्या चार महिन्यांपासून भांडुप पोलीस ठाण्यात त्या पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी रात्रपाळीवर येण्यासाठी त्यांनी मानखुर्द रेल्वे स्थानकातून सीएसटी लोकल पकडली. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मानखुर्द आणि गोवंडी स्थानकांदरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या हर्षा यांंच्या चेहऱ्यावर १६ टाके पडले आहेत, तर चार दातदेखील तुटले आहेत. (प्रतिनिधी)
‘त्या’ महिला पोलिसावर खासगी रुग्णालयात उपचार
By admin | Updated: July 4, 2015 01:38 IST