Join us  

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना मिळणार यावर्षी दिवाळीचा बोनस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 3:11 AM

Diwali bonus News : कंपन्याचे कोरोना काळात नुकसानीचा फटका बसला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बोनसवरही संक्रात आली आहे. परंतु कोरोना काळात काम करणाऱ्या अत्यावश्यक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे.

मुंबई : कोरोनाकाळात लॉक डाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले होते. पण आता  हळूहळू सर्व अनलॉक होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबलेले बाजाराचे चाक पूर्वपदावर येत आहे. दिवाळी सर्वात मोठा आहे. त्यामुळे सण साजरा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. कंपन्याचे कोरोना काळात नुकसानीचा फटका बसला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बोनसवरही संक्रात आली आहे. परंतु कोरोना काळात काम करणाऱ्या अत्यावश्यक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे.एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक आणि अध्यक्ष चंद्रकांत  साळुंखे म्हणाले की, दिवाळी देशातील मोठा सण आहे. तो उत्साहात साजरा केला जातो. विविध खाद्यपदार्थ तसेच कपड्याची, वस्तूंची खरेदी केली जाते. त्यासाठी कंपनीकडून बोनस दिला जातो. लहान कंपन्या एक पगार तर मोठ्या कंपन्या दोन पगार देतात. तर काही टक्केवारीनुसार देतात. ज्या कंपन्या बोनस देणार आहेत त्या साधारण दिवाळीच्या एक आठवडा आधी बोनस देतील.  

कोरोनात पगार मिळाले नाहीत, नोकऱ्या गेल्या. बोनस काय मिळेल हा प्रश्न आहे.. तसे पाहिले तर कायद्यानुसार बोनस खुप कमी लोकांना मिळतो. कोरोनात जे उद्योग सुरू आहेत त्यांना बोनस मिळेल पण बहुतांश कामगारांना बोनसचा लाभ मिळत नाही.    - विश्वास उटगी, कामगार नेते

कोरोना काळात अनेक उद्योग बंद होते त्यामुळे यंदा बऱ्याच कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याची शक्यता नाही. कामगारांनाही परिस्थितीची जाणिव आहे त्यामुळे ते देखील बोनस साठी आडून बसणार नाहीत. हे वर्ष केवळ जगण्याचे आणि जगवण्याचे वर्ष आहे    - मिलिंद कांबळे, संस्थापक अध्यक्ष डिक्की  

४० टक्के उद्योग सुरूमुंबईत सध्या १० लाख लहान मोठ्या उद्योग आहेत.सेवा क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, टेलिकम्युनिकेशन, फूड सेक्टरशी संबंधित कंपन्या,मुंबईतील जे लघु उद्योग, लेबर वर्कचे काम करणारे, गारमेंटचे काम करणारे हे जे घरगुती उद्योग, हॉटेल क्षेत्र सुरू झाले आहे. त्यापैकी केवळ ४० टक्के उद्योग सुरू आहेत.

 

टॅग्स :दिवाळीव्यवसाय