Join us

‘त्या’ आजींवरील कारवाईबाबत पोलिसांवर टीका

By admin | Updated: February 16, 2017 02:30 IST

राज्यपाल यांना भेटण्यासाठी वर्ध्याहून आलेल्या श्रीमती सुलभा गुलाबराव पिंगळे (वय ७३, रा. इंगोले चौक, मेन रोड, वर्धा) यांच्यावर मलबार हिल

जमीर काझी / मुंबईराज्यपाल यांना भेटण्यासाठी वर्ध्याहून आलेल्या श्रीमती सुलभा गुलाबराव पिंगळे (वय ७३, रा. इंगोले चौक, मेन रोड, वर्धा) यांच्यावर मलबार हिल पोलिसांनी दाखल केलेल्या गंभीर गुन्ह्याबाबत सर्व स्तरातून टीका होत आहे. निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञ, आरटीआय व महिला कार्यकर्त्यांनी याचा निषेध करत, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे, तर राज्य महिला आयोगाने आजींना कायदेशीर मदत करणार असल्याचे म्हटले आहे. राजभवनाच्या प्रवेशद्वारात पोलिसाच्या अंगावर शाई फेकल्याने, ७३ वर्षांच्या आजीवर सरकारी कामकाजात अडथळा आणून हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा भादंवि ३५३ अन्वये दाखल केला. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. त्यामुळे कोर्टात हजर केले असता, त्यांना २२ फेबु्रवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. सध्या या आजींची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली आहे. ‘लोकमत’मध्ये मंगळवारी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर, पोलिसांच्या कृतीबाबत सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणावर राजभवनातील अवर सचिव (प्रशासन) रमेश डिसोझा यांनी यापूर्वी दोन वेळा संबंधित आजींची भेट घेऊन, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मानसिक अवस्था ठीक नसल्याने त्यांना नेमके काय हवे, हे त्यासांगू शकल्या नाहीत. त्यांचे निवेदनातील मजकूरही असंबंद्ध असल्याचे ते म्हणाले.सुषमा पिंगळे यांनी राजभवनासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. पण काहीच निष्पन्न झाले नाही. ‘राज्यपाल महोदयांची भेट न मिळाल्यास पुन्हा शाई फेकू,’ असे त्या बडबडत होत्या. त्यामुळे मलबार हिल पोलिसांनी अटक करून, त्यांच्यावर सरकारी कामकाजात अडथळा, मारहाणीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मात्र, या प्रकरणात वरिष्ठ निरीक्षकांचे विधान धक्कादायक व कारवाई आततायीपणाची असल्याचे डिसोझा यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘पोलिसांना या आजींबाबतची परिस्थिती संयमाने हाताळण्याची आवश्यकता होती. आजींची मानसिकता व वयाचा विचार करण्याची गरज होती.भादंवि ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल केल्याने, पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.’