Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पाड्यांना मिळाले सौरउर्जेवर चालणारे दिवे

By admin | Updated: April 3, 2015 22:54 IST

गुरुवारच्या अंकात ‘जव्हार मधील आदिवसी पाडे आजही अंधारात’ या शिर्षकाखाली बातमी आली होती. नवीन पालघर जिल्ह्याकडून तरी आपल्याला

जव्हार ग्रामीण : गुरुवारच्या अंकात ‘जव्हार मधील आदिवसी पाडे आजही अंधारात’ या शिर्षकाखाली बातमी आली होती. नवीन पालघर जिल्ह्याकडून तरी आपल्याला वीज जोडणी मिळेल का? या आशेने पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे वीज जोडणी साठी मागणी केली होती. जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत वावर-वांजणी, पैकी रिडीपाडा, आरोळीपाडा तर बोपदरीपैकी पायवड, गोंडपाडा, माडवाचा गाव, तर दाभलोन मधील राहरेपाडा, निरपोळीचा पाडा, ग्रामपंचायत खरोडा व तिलोंडा पैकी नंबरेपाडा, दुलरण पाडा, सुकाळीचा माळ आणि झात ग्रामपंचायत पैकी मनमोहरी, हेदोली या १ हजार च्या जवळपास लोकवस्ती असलेल्या या १२ पाड्यांना महावितरण तर्फे जोडणी दिलेली नाही असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.या वृत्ताची प्रशासनाने तत्काळ दखल घेत झात ग्रामपंचायत मधील मनमोहरी व हेदोली या दोन पाड्यांवर प्रत्येक घरात सौर उर्जेवर चालणारे दिवे बसविण्याचे काम चालू आहे असे झाप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका तृप्ती बल्लाळ यांनी सांगितले. (वार्ताहर)