Join us

मुंबई शहरात पडली 30 हजार नवमतदारांची भर

By admin | Updated: October 4, 2014 01:27 IST

मुंबई शहरातील 1क् विधानसभा मतदारसंघात 1 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान झालेल्या मतदार नोंदणीत 3क् हजार 239 मतदारांची भर पडली आहे.

मुंबई : मुंबई शहरातील 1क् विधानसभा मतदारसंघात 1 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान झालेल्या मतदार नोंदणीत 3क् हजार 239 मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शहरातून 24 लाख 57 हजार 583 मतदार मतदान करणार आहेत.
दरम्यान, शहरात धारावी, शीव कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या 1क् मतदारसंघांतून नोंदणी केलेल्या नव्या मतदारांमध्ये 16 हजार 16 पुरुष आणि 14 हजार 223 महिला मतदारांचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एकाही तृतीयपंथी मतदाराने या वेळी नोंदणी केलेली नाही. याआधी झालेल्या मतदार नोंदणीत एकूण 69 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली होती. धारावीत 2 हजार 273, शीव कोळीवाडय़ात 2 हजार 82क्, वडाळ्यात 2 हजार 114, माहीममधून 2 हजार 583, वरळीतून 2 हजार 59क्, शिवडीतून 3 हजार 1क्6, भायखळ्यातून 2 हजार 4क्9, मलबार हिलमधून 2 हजार 996, मुंबादेवीतून 4 हजार 2क्4 आणि कुलाब्यातून 5 हजार 144 नव्या मतदारांनी नोंदणी केली आहे. (प्रतिनिधी)
 
मतदारसंघएकूण मतदार
धारावी2,39,क्59
शीव कोळीवाडा2,54,145
वडाळा1,96,9क्5
माहीम2,32,643
वरळी2,65,क्85
शिवडी2,73,416
भायखळा2,27,क्92
मलबार हिल2,77,772
मुंबादेवी2,37,75क्
कुलाबा2,53,716
एकूण24,57,583
 
उपनगरातील मतदार अन्य नोंदणी
च्उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत उपनगरांत केवळ 136 एवढय़ा अन्य मतदारांची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान अन्य मतदारांचा हा आकडा 118 एवढा होत आणि आता त्यात 18 ने वाढ झाली आहे.लोकसभेप्रमाणो विधानसभेलाही उपनगरांतील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, म्हणून उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत आजवर एकूण 77 लाख 41 हजार 93क् एवढय़ा मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये पुरुष आणि महिला मतदारांचा आकडा अनुक्रमे 42 लाख 64 हजार 851 आणि 34 लाख 76 हजार 943 एवढी आहे. विशेष म्हणजे यात 136 मतदार हे अन्य आहेत. 
 
विधानसभा
दहिसर- 34
भांडुप- 19
मालाड (प़) 4
घाटकोपर (प़)- 68
घाटकोपर (पू)- 1
चेंबूर- 2
कुर्ला- 3
वांद्रे (पूर्व)-5
एकूण-136