Join us  

तृतीय वर्ष बी.कॉमचा निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 6:32 AM

मुंबई विद्यापीठाने रविवारी रात्री एप्रिल-मे-जून २०१८ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बी.कॉम सेमिस्टर ५ व ६ या परीक्षेचा निकाल जाहीर केला

मुंबई : मुंबई विद्यापीठाने रविवारी रात्री एप्रिल-मे-जून २०१८ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बी.कॉम सेमिस्टर ५ व ६ या परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, बी.कॉम सेमिस्टर ६ च्या निकालाची टक्केवारी ६९.३१ आहे, तर तृतीय वर्ष बी.कॉम सत्र ५ मध्ये ४६.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सेमिस्टर ५ व ६ या दोन्ही परीक्षेत मिळून १,०२,२३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ९५,७६१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील ५५,१९३ विद्यार्थी दोन्ही परीक्षेत मिळूनउत्तीर्ण झाले. ७४,८६३ विद्यार्थ्यांनी सेमिस्टर ६ साठी नोंदणी केली. ७३,८१३ विद्यार्थी परीक्षेस बसले. ४५,१३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ६९.३१ आहे.सत्र ५ साठी २७,३७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी २१,९४८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात १०,०५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी ४६.४९ एवढी आहे.परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अर्जुन घाटुळे यांनी सांगितले की, बी.कॉमच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी संख्या मोठी असल्याने, तृतीय वर्षाचा निकाल निर्दोष, वेळेत लावण्यासाठी विशेष काळजी घेतली. यामुळेच १ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले.५,३३,५१२ उत्तरपत्रिका, ५,४२९ शिक्षकतृतीय वर्ष बी.कॉमच्या परीक्षेमध्ये तपासणीसाठी ५ लाख ३३ हजार ५१२ उत्तरपत्रिका होत्या. या उत्तरपत्रिका ५ हजार ४२९ शिक्षकांनी तपासल्या, तर ६० हजार ५५७ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले. या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व मॉडरेशन आॅनस्क्रीन मार्किंग पद्धतीने झाले आहे.सर्व्हरच्या क्षमतेत वाढ : विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर निकाल पाहणे सुलभ व्हावे, यासाठी सर्व्हरची क्षमता वाढविल्याची माहिती विद्यापीठाने दिली. विद्यापीठाने बी.कॉम सत्र ५ व ६ चा निकाल स्वतंत्र ६६६.े४े१ी२४’३२.्रल्ल या संकेतस्थळावरून जाहीर केला. १ लाखापेक्षा जास्त आसन क्रमांक असल्याने, बी.कॉम सत्र ६ च्या आसन क्रमांकानुसार २१ स्वतंत्र फाइल्स व बी.कॉम सत्र ५च्या १४ फाइल्स करून त्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या.... म्हणूनच निकाल वेळतबी.कॉम सत्र ६ चा निकाल हा मुंबई विद्यापीठाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मूल्यांकनाकडे विशेष लक्ष दिल्याने व शिक्षकांनी वेळेत मूल्यांकन केल्यानेच विद्यापीठाचे विविध निकाल वेळेत जाहीर करणे शक्य झाले. असेच सहकार्य पुढील परीक्षेतही प्राचार्य व शिक्षक करतील, अशी अपेक्षा आहे.- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

टॅग्स :मुंबई विद्यापीठबातम्या