Join us

तृतीयपंथीने वाहतूक पोलिसाची कॉलर खेचत केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:06 IST

मुंबई :ट्रॅफिक पोलिसाची कॉलर पकडत त्याला मारहाण करणाऱ्या तृतीयपंथीयासह तिघांना बांगुरनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. या प्रकरणाचा व्हिडीओ ...

मुंबई :

ट्रॅफिक पोलिसाची कॉलर पकडत त्याला मारहाण करणाऱ्या तृतीयपंथीयासह तिघांना बांगुरनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सदर तृतीयपंथी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

गोरेगावमध्ये बांगुरनगर पोलिसांच्या हद्दीत शनिवारी हा प्रकार घडला होता. तृतीयपंथी रिक्षात बसून निघाल्यानंतर त्याच रिक्षाची एका पादचाऱ्याला धडक बसली. तेव्हा त्याने चालकाशी वाद घालण्यास सुरवात केली. हा प्रकार वाहतूक पोलिसाने पाहिला आणि ते पादचाऱ्याच्या बचावासाठी गेले. तेव्हा तृतीयपंथीयाने त्यांची कॉलर पकडत त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार कैद झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानुसार बांगुरनगर पोलिसांनी त्याचा शोध घेत तिघांना अटक केली. यात मुख्य मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव मार्शल असून तो अभिलेखावरील गुन्हेगार आहे.