Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या आघाडीला पाठिंबा नाहीच- राहुल गांधी

By admin | Updated: May 3, 2014 22:08 IST

अमेठी : निवडणुकीनंतर काँग्रेस तिसरी आघाडी किंवा अन्य कोणत्याही आघाडीला समर्थन देणार नाही, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी स्पष्ट केले. अलीकडेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेली विधाने पाहता काँग्रेस तिसर्‍या आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे तर्कवितर्क सुरू झाले होते.

 अमेठी : निवडणुकीनंतर काँग्रेस तिसरी आघाडी किंवा अन्य कोणत्याही आघाडीला समर्थन देणार नाही, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी स्पष्ट केले. अलीकडेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेली विधाने पाहता काँग्रेस तिसर्‍या आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे तर्कवितर्क सुरू झाले होते. अमेठीच्या दोन दिवसांच्या दौर्‍याला शनिवारी सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. देशात कोणत्याही पक्षाला सरकार बनविण्यायोग्य बहुमत मिळण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत काँग्रेस तिसर्‍या आघाडीला समर्थन देणार काय, यावर राहुल गांधी नकारार्थी मान हलवत आम्ही कोणत्याही आघाडीला समर्थन देणार नसल्याचे स्पष्ट केले.बहुमत मिळवणारच.....सरकार स्थापण्यासाठी जोडतोड करणार काय, यावर त्यांनी पुन्हा नकार देत काँग्रेस बहुमताएवढ्या पूर्ण जागा मिळविणारच असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय विदेश मंत्री सलमान खुर्शीद यांनी अलीकडेच तिसर्‍या आघाडीला समर्थन देण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर अटकळबाजीला वेग आला होता, पण खुर्शीद यांनी नंतर लगेच आपले विधान मागे घेतले होते. काँग्रेसचा पाठिंबा महत्त्वाचा- करात१९८९ आणि ९६ मध्ये अशा सरकारच्या स्थैर्यावर काँग्रेसने समर्थन मागे घेतल्याने परिणाम झाला होता. काँग्रेस सकारात्मक भूमिका अवलंबणार नसेल तर असे आघाडी सरकार काम करणार नाही, असे उत्तर माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनीआघाडी सरकारच्या स्थैर्याबाबत विचारण्यात आले असता दिले. सत्ताधारी आघाडीत डाव्यांचा सहभागाबद्दल काँग्रेसने शंका व्यक्त केल्याबद्दल विचारण्यात आले असता त्यांनी हा प्रश्नच उद्भवणार नाही, असे नमूद केले. सर्वच पक्षांसोबत चांगले संबंध असल्यामुळे आम्ही सरकार स्थापण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. काँग्रेसकडे तेवढे संख्याबळ नसेल त्यामुळे संपुआ-१, संपुआ-२ सारखी परिस्थिती नसेल, असेही ते म्हणाले. 

केंद्रात तिसर्‍या यावेळी तिसर्‍या आघाडीचेच सरकार असेल. तुम्ही मला त्यासाठी संधी द्या.-सपा अध्यक्ष मुलायमसिंग यादव(उत्तर प्रदेशातील भदोही येथील प्रचारसभेत आवाहन)