म्हसळा : म्हसळा शहरातील मार्बल विक्रेत्याच्या नोकरांनी घरातून अडीच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. मात्र पोलिसांनी या चोरांचा पाठलाग करून तीन तासांत त्यांना जेरबंद केले आणि त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. म्हसळा शहरातील मार्बल व्यावसायिक अरुण तिवारी यांचे कांचन मार्बल्सचे दुकान आहे. या दुकानात रोहितकुमार फुलचंद यादव व धरमपाल मिठ्ठू यादव (दोघे मूळ रा. उत्तर प्रदेश) नोकरी करीत होते. शुक्रवारी मालक आपल्या खोलीत झोपले होते. त्यावेळी रोहितकुमार व धरमपाल यांनी मालकाच्या खोलीची बाहेरून कडी लावून बाजूच्या खोलीत ठेवलेल्या अडीच लाखांची रोकड घेऊन पोबारा केला.अरुण यांनी पोलीस तक्रार दाखल केली असता आरोपी वडवली फाटा येथे असल्याची माहिती उप-अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकासह सापळा रचून आरोपींना पकडले. आरोपींनी जंगलात पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस पथकाने त्यांना जेरबंद केले आणि त्यांच्याजवळील मुद्देमालही जप्त केला.
तीन तासांत चोर जेरबंद
By admin | Updated: February 14, 2015 22:26 IST
म्हसळा शहरातील मार्बल विक्रेत्याच्या नोकरांनी घरातून अडीच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. मात्र पोलिसांनी या चोरांचा पाठलाग करून तीन तासांत त्यांना जेरबंद केले
तीन तासांत चोर जेरबंद
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}