Join us

नेते झिजवताहेत बंडखोरांचे उंबरठे

By admin | Updated: April 10, 2015 03:38 IST

महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपात मोठी बंडखोरी झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील निष्ठावानांनी मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपात मोठी बंडखोरी झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील निष्ठावानांनी मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली आहे. १० एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख असल्याने तत्पूर्वी बंड शमविणे गरजेचे आहे. अन्यथा शिवसेना-भाजपाचे सत्तेचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून खासदार राजन विचारे आणि उपनेते विजय नाहटा यांच्याकडून बंडखोरांच्या घरी जाऊन त्यांना माघारीसाठी विनंत्या करण्यात येत आहेत. त्यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराज असलेले विजय चौगुलेंना यांना साकडे घातल्याचे समजते. मात्र, त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपाकडून आमदार मंदा म्हात्रेंसह पक्षश्रेष्ठींकडून मनधरणी सुरू आहे. काही प्रमाणात बंडखोरी झालेल्या राष्ट्रवादीतील नाराजांची समजूत काढण्याचे काम संजीव नाईक, संदीप नाईकांसह दस्तुरखुद्द गणेश नाईक करीत असल्याचे वृत्त आहे. (खास प्रतिनिधी)