Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोकरच निघाले चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:06 IST

घरातील ५५ लाखांच्या दागिन्यावर डल्ला, गावदेवी पोलिसांनी ठोकल्या बेडयानोकरच निघाले चोरघरातील ५५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; गावदेवी पोलिसांकडून ...

घरातील ५५ लाखांच्या दागिन्यावर डल्ला, गावदेवी पोलिसांनी ठोकल्या बेडया

नोकरच निघाले चोर

घरातील ५५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; गावदेवी पोलिसांकडून अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घरकामासाठी ठेवलेले नोकरच चोर निघाल्याचा प्रकार गावदेवी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आला आहे. यात, आरोपींनी घरातील ५५ लाखांच्या दागिन्यांवर हात साफ केला होता. गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली.

लाल महादेवी मुखिया, अनहुल मुखिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही बिहारच्या दरभंगा भागातील रहिवासी आहेत. दक्षिण मुंबईतील कोटेजा कुटुंबीयांनी त्यांना नुकतेच कामावर ठेवले होते. कोटेजा कुटुंबीयांचा विश्वास संपादन करत या मंडळींनी त्यांच्या हालचालींंवर लक्ष ठेवले. अशात, कोटेजा कुटुंबीयात वृद्ध नागरिक असल्यामुळे ते लवकर झोपत होते. सोमवारी कुटुंबीय कामानिमित्त बाहेर जाताच दुकलीने घरातील ५५ लाखांचे दागिने चोरुन पळ काढला. घरातील दागिने चोरी झाल्याबाबत समजताच त्यांच्या मुलीने गावदेवी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

त्यानुसार गावदेवी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. यात दोघेही नोकर बेपत्ता होते. त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावला. पुढे हाच धागा पकड़ून पोलिसांनी त्यांचे मोबाइल लोकेशन काढले. त्यात ते मुंबई सेंट्रल परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघांना अटक केली. मुंबई सेंट्रलवरून ट्रेन पकडून ते गावी बिहारला पळून जाणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली.

.....................