Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या गाडीतून पळून गेलेला चोर अटकेत

By admin | Updated: January 12, 2015 02:13 IST

पोलिसांच्या गाडीतून पळालेल्या एका अल्पवयीन आरोपी मुलाला जुहू पोलिसांनी कुर्ला येथील नेहरूनगर परिसरातून रविवारी सकाळी अटक केली आहे.

मुंबई : पोलिसांच्या गाडीतून पळालेल्या एका अल्पवयीन आरोपी मुलाला जुहू पोलिसांनी कुर्ला येथील नेहरूनगर परिसरातून रविवारी सकाळी अटक केली आहे.एका गुन्ह्यात अटक केलेल्या १६ वर्षीय मुलाला शनिवार संध्याकाळी डोंगरी बालसुधारगृहातून माहीम येथील टी. एच. कटारिया मार्ग माटुंगा चिल्ड्रन अ‍ॅन्ड सोसायटी, डेव्हिड ससून औद्योगिक शाळा येथे नेण्यात येत होते. त्या वेळी जुहू पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र नाईक (४५) हे त्याच्यासोबत व्हॅनमध्ये बंदोबस्ताला होते. संध्याकाळी या मुलाने व्हॅनमधून उडी मारली. नाईक पाठलाग करताना ते माटुंगा रेल्वे वर्कशॉपच्या छतावर चढले आणि त्यावेळी पत्रा तुटल्याने ते खाली पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील फरार अल्पवयीन मुलाला कुर्ला येथील नेहरूनगरमधून ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)