Join us  

और भी लडेंगे... महादेव जानकर बारामतीच्याच आखाड्यात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 11:59 AM

पाच जागा मागणार; विविध पक्षांतील नाराज रासपच्या संपर्कात

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेची जागा भाजपाकडे मागणार असून मी स्वत: बारामतीतून लढणार आहे, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. या मतदारसंघातून गतवर्षी खासदार सुप्रिया सुळेंना टक्कर दिली होती. यंदाही खासदार सुप्रिया सुळेंनाच राष्ट्रवादीकडून येथे उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यामुळे यंदाही ते सुप्रिया सुळेंविरुद्ध मैदानात उतरणा असल्याचे स्पष्ट दिसत आहे.  

महादेव जानकर पुढे म्हणाले की, अहमदनगरसह राज्यातील विविध पक्षांतील नाराज नेते रासपच्या सतत संपर्कात आहेत़ सध्या त्यांची कोणतीही राजकीय अडचण होऊ नये, यासाठी आम्ही कुणाचे नाव घेणार नाही़ लोकसभेला शिवसेना आणि भाजपाची युती झाली नाही, तर रासप पाच जागा मागणार आहे आणि युती झाली तर दोन जागांवर दावा करणार आहे़ आम्ही मागणार असणाऱ्या जागांमध्ये नगर दक्षिणेच्या जागेचा समावेश आहे. 

निवडणुकीआधी धनगर समाजाला आरक्षण

धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर आहे़ टीस संस्थेचा अहवाल सकारात्मक आहे़ त्यामुळे सर्व कायदेशीर बाबी तपासून राज्य सरकार या आरक्षणाबाबत केंद्राकडे शिफारस करणार आहे़ आरक्षण दिले नाही तर हा समाज सरकारविरोधात जाईल याची सर्वांना जाणीव आहे़ त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीआधी धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे जानकर यांनी सांगितल़े

 

टॅग्स :महादेव जानकरबारामतीसुप्रिया सुळे