Join us

भांडुपमधील ‘ते’ 25 लाख आले हवाला मार्गे

By admin | Updated: October 4, 2014 02:26 IST

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भांडुपमध्ये भाजीच्या पिशवीतून पकडण्यात आलेली 25 लाखांची बेहिशेबी रोकड ही कुवेत येथून हवाला मार्गे आली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भांडुपमध्ये भाजीच्या पिशवीतून पकडण्यात आलेली 25 लाखांची बेहिशेबी रोकड ही कुवेत येथून हवाला मार्गे आली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या 
प्रकरणी पोलीस कोठडीत रवानगी झालेल्या आरोपींकडे कसून चौकशी सुरू आहे.
 शौकत अली मेहबुब अली
खान (6क्), इनामुल हसन शौकत अली खान (32) आणि रामप्रसाद यादव (36) या तिघांना बेहिशेबी रोकड बाळगल्या प्रकरणी अटक केली होती.
न्यायालयाने त्यांना 4 ऑक्टोबर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी भांडुप सोनापूर येथून रिक्षाने भाजीच्या पिशवीतून 25 लाखांची रोकड घेऊन जात असताना भांडुप पोलिसांनी त्यांना बेडय़ा ठोकल्या होत्या. त्यांच्याकडे केलेल्या तपासात आरोपींकडे मिळालेली रोकड ही कुवेत येथून हवालामार्गे आल्याची माहिती समोर आली. 
गोरेगाव येथे गाळा खरेदी करण्यासाठी खान कुटुंबीयांच्या कुवेत येथे राहणा:या नातेवाइकांनी ही रक्कम पाठविल्याचे पोलिसांना सांगितले. 
ही रक्कम हवालामार्गे आल्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे. तसेच आरोपींकडील गाळा खरेदी करण्यासंबंधीची कगदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्यांचीही शहानिशा करण्यात येत आहे. पोलिसांसह आयकर 
विभागाचे अधिकारी त्यांच्याकडे 
कसून चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)