मुंबई : सरकारला उद्योग आणि उत्पादन क्षेत्रात जलद गतीने विकास हवा आहे. सध्या व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण ७६ परवान्यांची आवश्यकता आहे. पण यापुढे व्यवसाय सुरू करण्यासाठी केवळ २५ परवान्यांची आवश्यकता असेल अशी तजवीज सुरू असून भविष्यात त्याहीपेक्षा कमी परवाने लागावेत यासाठी प्रयत्न सुरू असतील. त्यामुळे प्रकल्प लाल फितीमध्ये अडकून पडणार नाहीत, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. गोल्डन महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंग समीट २0१५ चे उद्घाटन माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले. उत्पादन क्षेत्र आणि राज्याचे व्यवहार याबाबत या परिषदेत मुद्दे मांडण्यात आले. ज्यामध्ये विशेषत: महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग याचा आढावा घेणारा नॉलेज पेपर मान्यवरांसमोर सादर करण्यात आला. यावेळी एमएसएमईने उद्योजकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून सरकारशी संवाद घडविल्याबद्दल त्यांनी गोल्डन महाराष्ट्र डेव्हलपमेंट काऊन्सिलचे अभिनंदन केले. नियोजन आयोगाच्या अहवालानुसार मार्च २0१७ पर्र्यत अंदाजे एमएसएमई क्षेत्रात ५ हजार अब्ज इतका तुटवडा निर्माण होणार असून, तो संपूर्ण उत्पादन क्षेत्राच्या मागणीपेक्षा सुमारे ४३ टक्के इतका असणार आहे. तसेच आजही सुमारे १0 पैकी ९ एमएसएमई संस्था बँकांच्या वित्त विभागाचा लाभ घेऊ शकत नाहीत, असे गोल्डन महाराष्ट्र डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष विनोद गुप्ता यांनी सांगितले. एमएसएमईने सादर केलेल्या अहवालात एमएसएमई महाराष्ट्रात बजावत असलेली भूमिका आणि त्यातील अडचणींचाही आढावा मांडला आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी काही सूचनाही केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अर्थपुरवठा करणारी वित्तव्यवस्था, तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुलभ रचना बँकिंग निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच चांगल्या सुविधा निर्माण करणे आणि विविध कौशल्ये विकसित केले पाहिजेत, असेही सुचवले आहे. (प्रतिनिधी)च्नियोजन आयोगाच्या अहवालानुसार मार्च २0१७ पर्यंत अंदाजे एमएसएमई क्षेत्रात ५ हजार अब्ज इतका तुटवडा होणार असून, तो संपूर्ण उत्पादन क्षेत्राच्या मागणीपेक्षा सुमारे ४३ टक्के इतका असणार आहे.
उद्योगासाठी परमिटची कटकट कमी होणार
By admin | Updated: February 1, 2015 00:46 IST