Join us
Daily Top 2Weekly Top 5

...तर एमबीबीएस आणि बीडीएसच्या ८० ते ८५ टक्के जागांवर प्रवेश मिळेल

By admin | Updated: May 9, 2017 01:45 IST

एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशासाठी नीट ही प्रवेशपरीक्षा घेतली गेली. ७ मे रोजी झालेल्या या परिक्षेस १३ लाख ३५ हजार विद्यार्थी बसले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशासाठी नीट ही प्रवेशपरीक्षा घेतली गेली. ७ मे रोजी झालेल्या या परिक्षेस १३ लाख ३५ हजार विद्यार्थी बसले होते. नीट या तीन तासांच्या परिक्षेमध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांचे प्रत्येकी ४५ प्रश्न आणि जीवशास्त्र या विषयाचे ९० प्रश्न असे एकूण १८० प्रश्न विचारले गेले. ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराला चार गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला वजा एक (-१) दिले जातात. या संपूर्ण परिक्षेत तीन प्रश्न असे होते की ज्यांच्यासाठी योग्य उत्तराचा पर्याय दिला नव्हता. एका प्रश्नाचे दोन योग्य पर्याय उपलब्ध होते. आणि एक प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचा होता. दरम्यान, परिक्षा मंडळ सदस्यांनी जर या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना मार्क दिले तर बोर्डाचे सर्वांकडून कौतूकच होईल. प्रश्नपत्रिकेतील जवळपास १७५ प्रश्न सुटण्यास सुलभ होते. आणि जो विद्यार्थी या परिक्षेमध्ये पहिला येईल त्याला ६६० ते ६७० गुण प्राप्त होतील. प्रत्येक विद्यार्थ्यांची कमीत कमी ५०० गुण मिळावेत हीच अपेक्षा असेल. महाराष्ट्राप्रमाणेच अनेक राज्यामंध्ये ४००-४१५ पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएसच्या ८० ते ८५ टक्के जागांवर प्रवेश मिळेल, असे विश्लेषण राव आयआयटी अ‍ॅकेडमीचे व्यवस्थापकी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय कुमार यांनी या परिक्षेवर केले आहे.