Join us  

'त्या' पार्टीत ड्रग्ज नव्हते- करण जोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 1:48 AM

अकाली दलाचे नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनी एनसीबीकडे या पार्टीबद्दल तक्रार केली होती.

मुंबई :  पार्टीच्या व्हायरल व्हिडीओवरून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी)  चित्रपट निर्माते करण जोहर यांना समन्स बजावताच, करण यांनी पार्टीत ड्रग्ज नसल्याचे एनसीबीला सांगितले. त्यानुसार, एनसीबीचे पथक अधिक तपास करीत आहे.अकाली दलाचे नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनी एनसीबीकडे या पार्टीबद्दल तक्रार केली होती. या व्हिडीओबद्दल करण यांनी अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले होते. २०१९ च्या हाउस पार्टीमध्ये ड्रग्ज वापरले गेले नसल्याचे त्यांनी नमूद केले होते. यात ते स्वत: ड्रग्ज घेत नाहीत, तसेच ते ड्रग्जला प्रोत्साहनही देत नसल्याचेही नमूद केले होते. त्यांच्या पार्टीत दीपिका पदुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, रणबीर कपूर, वरुण धवन, विक्की कौशल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी होते.या प्रकरणी तपास करीत असलेल्या एनसीबीने करण यांना २०१९ मध्ये केलेल्या या पार्टीशी संबंधित सर्व तपशील देण्याबाबत समन्स बजावले होते. शुक्रवारपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ दिली होती. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी एनसीबीच्या नोटीसला उत्तर देताना, पार्टीत ड्रग्ज नव्हते तसेच पाट्रीत ड्रग्ज घेतले नसल्याचे सांगितले. 

टॅग्स :नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकरण जोहर