Join us

सुमन नगरमध्ये दिवे लागले

By admin | Updated: June 20, 2016 02:49 IST

चेंबूरमधील सायन-पनवेल महामार्गावरून सुमन नगर व लाल डोंगर विभागांना जोडणाऱ्या मार्गावरील खांबांवर अखेर दिवे बसवण्यात आले आहेत

मुंबई : चेंबूरमधील सायन-पनवेल महामार्गावरून सुमन नगर व लाल डोंगर विभागांना जोडणाऱ्या मार्गावरील खांबांवर अखेर दिवे बसवण्यात आले आहेत. येथील खांबांवर दिवे नसल्याने मार्गावर अंधार असतो. शिवाय त्याचा स्थानिकांना त्रास होतो, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल संबंधित प्रशासनाने घेत उचित कार्यवाही केल्याने स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ‘लोकमत’ने १८ जून रोजी यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताचे स्थानिकांकडून स्वागत करण्यात येत असतानाच त्याच दिवशी सायंकाळी संबंधित प्राधिकरणाने खांबावर दिवे बसवल्याने स्थानिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)