Join us  

राज्यात अद्याप शेतक-यांची कर्जमाफी झाली नाही - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 4:31 PM

 राज्यातील शेतक-यांच्या कर्जामाफीची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र अद्याप राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी झाली नसल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.  

ठळक मुद्दे शेतक-यांची कर्जमाफी करताना सत्याला धरुन करावी89 लाख शेतक-यांची यादी विधानसभेत जाहीर करावीचुनावी जुमला करुन संरक्षण मंत्रिपद नकोजनतेची ताकद मोठी, अहंकाराने वागू नका

मुंबई, दि. 18 -  राज्यातील शेतक-यांच्या कर्जामाफीची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र अद्याप राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी झाली नसल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.  

मुंबईतील आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी अद्याप राज्य सरकारकडून झाली नाही. ही शेतक-यांची कर्जमाफी करताना सत्याला धरुन करण्यात यावी. तसेच, कर्जमाफीनंतर सरकारने राज्यातील 89 लाख शेतक-यांची यादी विधानसभेत जाहीर करावी. यामध्ये सर्व शेतका-यांची नावे आणि त्यांचा पत्ता असावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपाचे खासदार नाना पटोल म्हणतात की, राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी भ्रमक आहे. त्यावरुन तुम्हीच ठरवा काय खरं आहे, असा सवाल करत 'जनतेची ताकद मोठी आहे, त्यामुळे अहंकाराने वागू नका' असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला हाणला. देशाचे संरक्षण मंत्रिपद म्हणजे असे तसे नाही, त्याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. त्यामुळे फक्त चुनावी जुमला करुन संरक्षण मंत्रिपद नको. ते कामयस्वरुपी हवे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर सुद्धा हल्लाबोल केला. यातबरोबर, सण साजरे करायचे असतील तर सगळयांनी करावे. मात्र हिंदू सणांवर निर्बंध लादले आणि इतरांचे भोंगे चालू राहिले, तर शिवसेना गप्प बरणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सणांवर लाउडस्पीकर बंदीविरोधात बोलताना सांगितले. 

याशिवाय,  आगामी 2019 च्या निवडणुकीसाठी कामाला लागा. आपसातील हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे, असे पक्षातील मंत्री आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगितले. याचबरोबर, या निवडणुकीसाठी विविध भागांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, मराठवाड्याची जबाबदारी रामदास कदम यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच, विदर्भाची जबाबदारी दिवाकर रावते आणि मुंबई व कोकण विभागाची जबाबदारी सुभाष देसाई यांच्याकडे सोपविण्यात आली, असल्याचेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :शिवसेना