मुंबई : ई-निविदेच्या घोटाळ्यात नऊ प्रभागांमधील कार्यकारी अभियंत्यांपासून दुय्यम अभियंता गुंतले आहेत़ रात्री दोन अथवा पहाटे चार ते सहा या वेळेत ही हातचलाखी होत असे, अशीही धक्कादायक बाब समोर आली आह़े त्यामुळे ई-निविदेनुसार देण्यात आलेल्या सर्व कंत्रटांचीही चौकशी होण्याचे संकेत आहेत़
ई-निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार सुरू असल्याचा ठपका टेस्ट ऑडिट अॅण्ड व्हिजिलन्स ऑफिसरने (टाओ) ठेवला आह़े या प्रकरणाची उपायुक्त वसंत प्रभू यांच्यामार्फत सखोल चौकशी सुरू आह़े मात्र प्राथमिक माहितीनुसार विशेषत: पश्चिम उपनगरांतील प्रभागांमध्ये हा घोटाळा झाल्याचे दिसून येत आह़े पहाटे चार ते सहा या वेळेत ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत अस़े
त्याचवेळेत मर्जीतील ठेकेदार निविदा भरून मोकळे होत असत़ त्यानंतर लिंक ब्लॉक करण्यात येत होती, अशा पद्धतीने हा घोटाळा ब:याच काळार्पयत सुरू होता़ एका ठेकेदारानेच ही बाब प्रशासकीय अधिका:यांच्या कानावर घातल्यानंतर टाओने या प्रकरणात लक्ष घातल़े त्यामुळे ई-निविदा सुरू झाल्यापासूनच्या कामांची पडाळतणी करण्याचाही प्रशासनाचा विचार सुरू आह़े (प्रतिनिधी)
प्रभागस्तरावील तीन ते पाच लाख रुपयांच्या कामांमध्ये हा गैरव्यवहार होत होता़
टाओने अशा 49 निविदांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आह़े के पश्चिम, के पूर्व, आर
उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, पी उत्तर, पी दक्षिण, एच पूर्व आणि टी म्हणजेच वांद्रे, अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहीसर, मुलुंड या वॉर्डामध्येच हा घोटाळा झाल्याचे प्राथमिक स्तरावर दिसून येत आह़े
पालिकेची गुरुवारची महासभा वादळी : नगरसेवक आणि ठेकेदारांच्या संगनमताने वॉर्डातील कामांमध्ये गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप लेखापाल यांनी तीन वर्षापूर्वी केला होता़ याचे तीव्र पडसाद सभागृहात उमटून प्रशासन विरुद्ध नगरसेवक असे युद्ध पेटले होत़े मात्र आता हा घोटाळा उघड झाल्यामुळे नगरसेवकांमध्ये संतापाची लाट आह़े हीच संधी साधून आयुक्त सीताराम कुंटे यांना जाब विचारण्याचे मनसुबे विरोधी पक्षांनी आखले आहेत़ नगरसेवकांवर गैरव्यवहाराचा आरोप करणा:या आयुक्तांची आपल्या अधिका:यांकडे डोळेझाक का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला आह़े