Join us
Daily Top 2Weekly Top 5

भिंतीबाबत पूर्वसूचना दिली होती

By admin | Updated: July 13, 2014 02:02 IST

सॅण्डहस्र्ट रोड रेल्वे फलाट क्ऱ 1 वर संरक्षण भिंत कोसळण्याची स्थिती असल्याची पूर्वसूचना पालिकेने आदल्याच दिवशी म्हाडा व रेल्वे प्रशासनाला दिली होती़

मुंबई : सॅण्डहस्र्ट रोड रेल्वे फलाट क्ऱ 1 वर संरक्षण भिंत कोसळण्याची स्थिती असल्याची पूर्वसूचना पालिकेने आदल्याच दिवशी म्हाडा व रेल्वे प्रशासनाला दिली होती़ त्यानुसार या इमारतीमधील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलविल्यामुळे 21 कुटुंबांवरील तसेच रेल्वे प्रवाशांवरील संकट टळल़े
सॅण्डहस्र्ट रोड रेल्वे स्थानक फलाट क्ऱ 1 येथील थोरात नामक इमारत उपकरप्राप्त म्हणजे 194क् पूर्वीची आह़े म्हाडाच्या अखत्यारीत असलेल्या या इमारतीमध्ये 21 सदनिका आहेत़ पावसाळापूर्व सव्रेक्षणानंतर या इमारतीला धोकादायक जाहीर करण्यात आले होत़े तरीही रहिवासी जीव मुठीत घेऊन त्याच ठिकाणी राहत होत़े परिणामी या धोकादायक इमारतीच्या संरक्षण भिंतीचा भाग गुरुवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास रेल्वे फलाट क्ऱ 1 वर कोसळला़ या दुर्घटनेनंतर पालिकेने तात्काळ त्या ठिकाणी पाहणी करून इमारत रिकामी करण्याची नोटीस म्हाडाला दिली़ तसेच रेल्वेरूळ सुरक्षित करण्याची सूचना रेल्वे प्रशासनाला देण्यात आली़ मात्र कोणतीही कारवाई होण्यापूर्वीच शुक्रवारी दुपारी ही संरक्षण भिंत ट्रकवर कोसळली़ याची गंभीर दखल घेऊन आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी तत्काळ म्हाडा आणि रेल्वे अधिका:यांची बैठक बोलावली होती़ 
आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम, रेल्वे अभियंता सिंह, म्हाडाचे उप अभियंता, अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी व उपायुक्त (परिमंडळ 1) रमेश प्रभू उपस्थित होत़े या बैठकीत सदर धोकादायक इमारत रिकामी करून तात्काळ पाडून घेण्याचे निर्देश म्हाडाला देण्यात आल़े तसेच उभय प्राधिकरणांकडून समन्वय व सहकार्याची हमी घेण्यात आली़
येथील 21 कुटुंबांबरोबरच रेल्वे प्रवाशांचे जीवही धोक्यात आले असत़े त्यामुळे शुक्रवारी ही इमारत रिकामी करून येथील रहिवाशांना शिवडी येथे स्थलांतरित करण्यात आले आह़े, असे बी वॉर्डाचे साहाय्यक आयुक्त एस़ पी़ किलिजे यांनी सांगितल़े (प्रतिनिधी)
 
च्सॅण्डहस्र्ट रोड स्थानकाजवळील धोकादायक भिंत कोसळल्यामुळे दोन दिवस रेल्वे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. या दुर्घटनेनंतर पालिकेने तात्काळ ठिकाणाची पाहणी करून इमारत रिकामी करण्याची नोटीस म्हाडाला दिली. त्यामुळे आता ही इमारत पाडण्यात येणार असल्याने रविवारी मध्य रेल्वेच्या शंभर फे:या रद्द करण्यात आल्या आहेत.
च्म्हाडातर्फे इमारत पाडण्याचे काम शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी सात वाजेर्पयत पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील माटुंगा आणि मुलुंडदरम्यान असणारा ब्लॉक रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. 
च्याशिवाय हार्बरवर आज सकाळी 11.3क् ते दुपारी 3.3क् र्पयत कुर्ला- सीएसटीदरम्यान मेगाब्लॉक असेल. तसेच वडाळा- माहीम दरम्यानही अप आणि डाऊन मार्गावरील मेगाब्लॉक पूर्वी घोषित केल्याप्रमाणो असेल.