Join us  

मराठीत अभिमान वाटावं असं खूप काही आहे, चला, आपणही त्यात भर घालूया..!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 2:39 PM

क.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे मराठी प्रबोधन आता इंस्टाग्राम, फेसबुक पेज आणि युट्यब चॅनेलवर कार्यरत राहणार आहे.

 

मराठी प्रबोधन ह्या युट्युब चॅनलचा आरंभ

मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मराठमोळ्या मराठी प्रबोधन ह्या युट्युब चॅनलचा आरंभ करण्यात आला.

क.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे मराठी प्रबोधन आता इंस्टाग्राम, फेसबुक पेज आणि युट्यब चॅनेलवर कार्यरत राहणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक  यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारंभाचे औचित्य साधून या नव्या दालनात प्रवेश करत करण्यात आल्याचे प्रा.अभिजित देशपांडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या साहित्य कलागुणांना संधी मिळावी आणि मराठी साहित्य अनेकविध उपक्रमांनी सर्वदूर पोचवावे हा यामागचा हेतू आहे, असेही देशपांडे म्हणाले. आपल्या सर्वांच्या सहकार्याने, प्रोत्साहनाने, प्रेरणेने   ही संकल्पना अधिक यशस्वी करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर प्रा.मीरा कुलकर्णी यांनी सांगितले की, सोमय्या संकुलातील आपण सगळेच खूप आनंदीत, उत्सुक आहोत. कारण मुंबईमध्ये एखाद्या महाविद्यालयाच्या मराठी मंडळाचं यूट्यूब चॅनल हे  पहिल्यांदाच आपल्या सोमय्याच्या मराठी विभागाचे आणि मराठी प्रबोधनचे आहे.

टॅग्स :मराठीमहाविद्यालयमुंबई