Join us

बुधवारी ठाण्यात पाणी नाही

By admin | Updated: January 5, 2015 22:52 IST

उल्हास नदीच्या आंध्रा व बारवी धरणांच्या उपलब्ध साठ्याच्या नियोजनाबाबत झालेल्या निर्णयानुसार सध्या १५ दिवसांनी एकदा पाणीकपात करण्यात येत आहे.

ठाणे : उल्हास नदीच्या आंध्रा व बारवी धरणांच्या उपलब्ध साठ्याच्या नियोजनाबाबत झालेल्या निर्णयानुसार सध्या १५ दिवसांनी एकदा पाणीकपात करण्यात येत आहे. त्यानुसार, स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून होणारा ठाणे शहराचा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहणार आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या २१० दशलक्ष लीटर योजनेंतर्गत अत्यावश्यक दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने या कालावधीत इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, समतानगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, सूरकरपाडा, जॉन्सन, इटर्निटी, सिद्धेश्वर, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर व मुंब्रा, काही भाग, घोडबंदर रोड, बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर, महागिरी, साकेत कॉम्प्लेक्स, घोडबंदर व खारटन रोड परिसर या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.