Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्या ठाण्यात पाणी नाही

By admin | Updated: February 24, 2015 00:42 IST

उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, कळवा यांनी १४ टक्के पाणीकपात करण्याचे निश्चित

ठाणे : उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, कळवा यांनी १४ टक्के पाणीकपात करण्याचे निश्चित केल्याने स्टेम कंपनीकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा दर बुधवारी बंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार, बुधवार २५ फेबु्रवारीला सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील पाणीपुरवठा बंद राहील. या कालावधीत सिद्धेश्वर, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर व मुंब्रा या भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता असल्यानेही पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)