Join us

सिडको क्षेत्रात पाणीपुरवठा नाही

By admin | Updated: March 30, 2015 22:29 IST

हेटवणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवर दिघाटीजवळ कंटेनर कोसळल्याने जलवाहिनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या जलवाहिनीच्या

नवी मुंबई: हेटवणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवर दिघाटीजवळ कंटेनर कोसळल्याने जलवाहिनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे द्रोणागिरी, खारघर व उलवे या सिडको नोड्समध्ये पुढील चोवीस तास पाणी पुरवठा होणार नाही, असे सिडकोने कळविले आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेल आणि परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या असून अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण आहेत. त्याचबरोबर वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने इमारतींच्या वरच्या मजल्यांवर पाणी चढवताना अडचणी येत असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. कधी पाणी येत नाही तर कधी वीज नसल्याने पाणी पुरवठा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)