ठाणो : उल्हास नदी पाणीसाठय़ाच्या नियोजनासाठी कळवा लघुपाटपंधारे विभागाकडून 14 टक्के पाणीकपात होणार असल्याने स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा दर 15 दिवसांनी येणा:या बुधवारी सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 या कालावधीत बंद राहणार आहे.
या कालावधीत सिद्धेश्वर, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर व मुंब्रा या भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. परंतु, ठाणो महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याने इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, समतानगर, साकेत येथील पाणीपुरवठा सुरू राहील. (प्रतिनिधी)