Join us  

ई-पासमध्ये गणपतीसाठी प्रवासाचा पर्यायच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 6:16 AM

कोकणवासीयांच्या परवानग्या रखडल्या; लवकरच तोडगा निघण्याची शक्यता

मुंबई : गणेशोत्सवासाठी महिनाभर आधीच मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची धडपड सुरू असते. यंदा कोरोनामुळे ई-पासशिवाय त्यांना गावात जाण्याची परवानगी नाही. त्यातच पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या ई-पासमध्ये गणपतीसाठी प्रवासाचा पर्याय नसल्याने चाकरमान्यांची पंचाईत झाली आहे. दरम्यान, यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचे मुंबई पोलीस प्रवक्ते शहाजी उमाप यांनी सांगितले.

चाकरमान्यांनी गणपतीसाठी ई-पासचा घाट नको, अशी मागणी केली होती. शिवाय कोकणवासीयांसाठी विशेष व्यवस्था करण्यास विनंती केली होती. मात्र मुंबई पोलिसांच्या ई-पासमध्ये गणपतीसाठीचा प्रवासाचा पर्याय नसल्याने कुणालाही अद्याप परवानगी दिली नाही. तांत्रिक अडचण दूर होताच परवानगी देण्यात येईल, असे उमाप यांनी सांगितले.

एकीकडे कोकणाची वाट धरणाऱ्यांना गावी गेल्यानंतर १४ तर कुठे ७ दिवस क्वारंटाइन राहणे बंधनकारक आहे. अवघ्या काही दिवसांवर गणपतीचा सण आल्याने लवकरात लवकर ई-पास तरी द्या, अन्यथा पर्यायी व्यवस्था करा, असा सूर चाकरमान्यांमधून जोर धरत आहे.एसटी व्यवस्था करण्याबाबत शासनाकडून निर्देश नाहीतगणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे, परंतु एसटीच्या व्यवस्थेबाबत शासनाने काही खुलासा न केल्यामुळे गणेशभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत एसटीच्या अधिकाºयांकडे विचारणा केली असता गणेशोत्सवासाठी एसटीची व्यवस्था करण्याबाबत शासनाकडून कोणतेही निर्देश आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईगणेशोत्सव विधी