Join us

हेरिटेज वास्तूंबाहेरील पदपथांना धोका नाही !

By admin | Updated: October 18, 2014 00:52 IST

पुरातन वास्तूंपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाची इमारत परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करत़े

मुंबई : पुरातन वास्तूंपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाची इमारत परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करत़े या इमारतीबाहेरच असलेल्या पदपथाच्या डागडुजीचे काम नुकतेच पालिकेने हाती घेतले आह़े परंतु रस्त्यांची कामे सुमार दर्जाची होत असल्याचा ठपका नुकताच थर्डपार्टी ऑडिटने ठेवल्यानंतर जुने दगड बसविण्याच्या कामाबाबतही साशंकता व्यक्त होऊ लागली आह़े
सन 1888 मध्ये बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाची इमारत पुरातन वास्तू श्रेणी 1 मध्ये गणली जात़े त्यामुळे येथील इमारतीच्या दुरुस्तीसाठी पुरातन वास्तू समितीची परवानगी घेणो आवश्यक आह़े मात्र या इमारतीबाहेरील पदपथावरचे पुरातन दगड काढून नवीन बसविण्याचे काम गेले काही दिवस सुरू आह़े अनेक ठिकाणी पदपथांवर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे फिव्हर असल्याने त्याची लागण या कामासही होण्याची भीती मुंबईकरांकडून व्यक्त होत आह़े
मात्र या पदपथावरील काही जुने दगड निघाल्यामुळे ए विभाग कार्यालयामार्फत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आह़े यात जुनेच दगड पुन्हा बसविण्यात येतील, तसेच सीएसटीच्या पुरातन वास्तूला व त्याच्या सौंदर्याला बाधा पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल, अशी हमी पालिकेच्या एका वरिष्ठ अधिका:याने दिली़ तसेच जोर्पयत पुरातन वास्तूला धक्का न देता जुनेच दगड पुन्हा बसविण्यात येत असल्यास या दुरुस्तीला आमची हरकत नसल्याचे मुंबई पुरातन वास्तू संवर्धन समितीचे अध्यक्ष व्ही़ रंगनाथन यांनी स्पष्ट केल़े (प्रतिनिधी)