Join us  

अनंत चतुर्दशीला सायंकाळी ५ ते १० पर्यंत चर्नी रोडवर धिम्या लोकलला थांबा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 6:07 AM

विसर्जनानिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी अनंत चतुर्दशीला सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत चर्नी रोड स्थानकात अप मार्गावरील धिम्या लोकलला थांबा न देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

मुंबई : विसर्जनानिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी अनंत चतुर्दशीला सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत चर्नी रोड स्थानकात अप मार्गावरील धिम्या लोकलला थांबा न देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. तर प्रवाशांच्या सोईसाठी ५ वाजून ३० मिनिटे ते ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत सर्व अप जलद लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट स्थानकांदरम्यान थांबविण्यात येतील.चर्नी रोड स्थानकातील फलाट क्रमांक २ वरील अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी अप दिशेकडील सर्व धिम्या लोकलचा चर्नी रोड स्थानकातील थांबा रद्द करण्यात आला आहे.यामुळे फलाट क्रमांक२ वरून कोणतीही लोकल उपलब्ध नसेल. तर प्रवाशांच्या सोईसाठी सायंकाळी गर्दीच्या वेळेत ५ वाजून ३० मिनिटे ते ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत सर्व अप जलद लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट स्थानकांदरम्यान थांबविण्यात येणार असल्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

टॅग्स :लोकल