Join us  

‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 12:54 AM

टेलिकम्युनिकेश सेल साईट (टीसीएस) / बेस स्टेशन व इलेक्ट्रिकेशन नेटवर्कच्या उपकरणापासून बनविलेले विद्युतीय चुंबकीय विकिरण मानवी आरोग्यावर व अन्य सजीवांवर विपरित परिणाम करत असल्याबाबत कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

मुंबई: टेलिकम्युनिकेश सेल साईट (टीसीएस) / बेस स्टेशन व इलेक्ट्रिकेशन नेटवर्कच्या उपकरणापासून बनविलेले विद्युतीय चुंबकीय विकिरण मानवी आरोग्यावर व अन्य सजीवांवर विपरित परिणाम करत असल्याबाबत कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. या वैज्ञानिक अचूकतेच्या अभावामुळे उच्च न्यायालयाने अ‍ॅन्टॉप हिल, लोअर परेल याठिकाणील मनोरंजन पार्कमधील मेसर्स रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. ला मुंबई महापालिकेने टीसीएस उभारण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करण्यास नकार देत सोसायट्यांची याचिका निकाली काढली.मातोश्री रमाबाई केशव ठाकरे उद्यान व व्ही. शांताराम बालोद्यान या मनोरंज पार्कवर मोबाईल टॉवर उभारण्याची परवानगी रिलायन्स जिओला मुंबई महापालिकेने २०१४ व १५ मध्ये दिली. या परवानग्यांना येथील आजुबाजूच्या सोसायट्यांनी आव्हान दिले.या टीसीएसमुळे मानवी आरोग्यावर व अन्य सजीवांवर आणि पर्यावरणावर विपरित परिणाम होईल, अशी भीती सोसायट्यांमधील रहिवाशांनी व्यक्त केली.मात्र, न्यायालयाने म्हटले की, वैज्ञानिक पुराव्यांच्या आणि त्यातील निष्कर्षाची तपासणी न करता केवळ या अहवालांच्या ताकदीवर याचिकाकर्त्यांचा मुद्दा योग्य ठरवला जाऊ शकत नाही. राज्य सरकारने नियमावलीद्वारे पुरेशी काळजी घेतली आहे. या नियमावलीद्वारे हे क्षेत्र नियमित करण्यात आले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे म्हणत न्यायालयाने सोसायट्यांनी टीसीएस उभारण्याविरोधात केलेल्या याचिका निकाली काढल्या.