Join us

इमारतींमध्ये रेन हार्वेस्टिंगची व्यवस्थाच नाही

By admin | Updated: May 27, 2014 01:52 IST

झपाटयाने विकसित होणाया कल्याण तालुक्यातील टोलेजंग इमारतींमध्ये कुठेच रेन हार्वेस्टिंगची व्यवस्था दिसत नसून यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय याच इमरतींमध्ये दररोज होत आहे

खडवली : झपाटयाने विकसित होणाया कल्याण तालुक्यातील टोलेजंग इमारतींमध्ये कुठेच रेन हार्वेस्टिंगची व्यवस्था दिसत नसून यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय याच इमरतींमध्ये दररोज होत आहे  भातसा, काळू, उल्हास नदीकाठच्या गावांची जलप्रदूषणाची समस्या आणि या नद्यांच्या जलशयांतून होणारा पाण्याचापुरवठा लक्षात घेऊन या परिसरातील प्रत्येक इमारतीने रेन हार्वेस्टिंगची व्यवस्था होणे अंत्यत गरजेचे झाले आहे मात्र शासन अशा इमारतीकडे साफ दुर्लक्ष करित असल्याचे पर्यावरण समितीचे म्हणणे आहे . कल्याण तालुक्याच्या टिटवाळा खडवली म्हारळ गोवेली राया गुरवली अशा भागात झपाटयाने इमारतींचे काम झाले आहे. या इमारतीमध्ये हजारोच्या संख्येने रहिवासी राहायलाही आले आहे  खडवलीमध्ये भातसा नदीकाठीच मोठया संख्येन इमारती उभ्या झाल्या आहेत  रायता म्हारळ भागातसुद्धा उल्हासनदीच्या काठावर मोठी बांधकाम झालेली आहेत टिटवाळयाजवळ काळू नदीचे शुद्ध जलस्त्रोत आहे आणि याच नदीकाठावर टोलेजंग इमारती उभ्या झाल्या आहेत  पण नवलाईची बाब म्हणजे या सर्व इमारतीमध्ये कुठेच वर्षा जलसंचय व विनीयोग योजना दिसून येत नाही  परिणामी दररोज हजारो लिटर शुद्ध पाणी वाया जात असल्याचे पर्यावरण समितीचे म्हणणे आहे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर सारखा होत असून यामुळे भूजलाच्या पातळीत घट येत असल्याचे दिसून येत आहे़ पाण्याचा मनमानी वापर करून हेच सांडपाणी उघडयावर सोडण्याची करामतही खडवलीच्या काही भागात होत असून या सांडपाण्याने एकीकडे मोठया प्रमाणावर डासांची उत्पती वाढत आहे तर दुसरीकडे भातसाचे शुद्व पात्र दूषित होण्याची भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.