Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्यसह पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा-जंबोब्लॉक नाही

By admin | Updated: June 20, 2015 22:58 IST

गुरुवारी ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती करणाऱ्या यंत्राचा बेल्ट रुळांमध्ये अडकल्याच्या घटनेने आणि शुक्रवारी मुंबईसह उपनगरात

डोंबिवली : गुरुवारी ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती करणाऱ्या यंत्राचा बेल्ट रुळांमध्ये अडकल्याच्या घटनेने आणि शुक्रवारी मुंबईसह उपनगरात पडलेल्या पावसामुळे लाइफलाइन तुंबून ठप्प झाली होती. त्याचा फटका लाखो चाकरमान्यांना बसला. त्यांना दिलासा देण्यासाठी रविवारी मेगा-जंबो ब्लॉक न घेण्याचा निर्णय मध्य-पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना झालेल्या त्रासाची रेल्वे प्रशासनाने दखल घेतल्याबाबत ठिकठिकाणच्या प्रवासी संघटनांनी अधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आधीच आठवडाभर डिसी-एसी रुपांतरणाच्या कामामुळे मध्य रेल्वेच्या पंक्चूअ‍ॅलीटी (वक्तशीरपणा)वर परिणाम झालेला असल्याने रोज शेकडोहून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. म.रेच्या परिचालन विभागातील वरिष्ठ सूत्रांच्या माहिती नुसार गेल्या आठवड्यात विविध तांत्रिक कारणांमुळे वक्तशीरपणाची टक्केवारी ९३ वरुन ५० टक्कयांवर घसरल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच प्रतीदिन विविध मार्गावरील रेल्वे सेवा २० ते ३५ मिनिटे विलंबाने धावली होती. त्यातच गुरुवार-शुक्रवारच्या घटनांमुळे प्रशासनाच्या उद्दीष्टांचा बट्याबोळ झाल्याचेही सांगण्यात आले. अशातच प्रवाशांना झालेला त्रासाची परिणिती ‘दिव्या’च्या घटनेसारखी होऊ नये याची खबरदारी म्हणून प्रशासनाने ब्लॉक रद्द केल्याची चर्चा आहे.शनिवारी २० ते ३५ मिनिटे लेट : दोन दिवसांच्या पावसामुळे शुक्रवारी ठप्प झालेली रेल्वेचा वेग शनिवारी मंदावलेला होता. सायन ते भांडुप तसेच मस्जिद परिसरातील ट्रॅकमध्ये साठलेल्या पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागल्याने लोकलचा वेग धीमा होता. कल्याण-ठाणे २० मिनिटे तसेच पुढे सीएसटीपर्यंत ३५ मिनिटे विलंबाने लोकल धावल्या. सकाळच्या सत्रातील विलंबानंतर दुपारच्या वेळेत काहीसा वेग धरला होता. परंतु, तरीही नेहमीसारखा वेग नसणे, ठिकठिकाणी गाड्या थांबणे आदींसह कासवगतीने गाड्या पुढे जाण्याचा अनुभव सेकंड शीफ्टसह शनिवारच्या अर्धा दिवसाने परतीच्या मार्गावरील प्रवाशांना आला.