Join us

आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणी कमी नाही

By admin | Updated: August 10, 2014 02:05 IST

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोणताही खेळाडू कमी दर्जाचा नसतो, असा सल्ला पाच वेळचा विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने युवा बुद्धिबळपटूंना दिला.

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळताना भारतीय युवा खेळाडूंनी आपल्या तंत्रवर योग्य भर द्यावा. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोणताही खेळाडू कमी दर्जाचा नसतो, असा सल्ला पाच वेळचा विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने युवा बुद्धिबळपटूंना दिला. आगामी ऑक्टोबर महिन्यात पुण्यात होणा:या जागतिक कुमार बुद्धिबळ स्पर्धेची नुकतीच मुंबईत घोषणा करण्यात आली. या वेळी स्पर्धेचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून आनंद बोलत होता.
या स्पर्धेचे 1988 मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर माङया आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ख:या अर्थाने सुरुवात झाली. युवा खेळाडूंसाठी ही स्पर्धा सुवर्णसंधी आहे, असे सांगताना आनंदने बुद्धिबळ स्पर्धेचे थेट प्रक्षेपण झाल्यास त्याचा फायदा खेळाच्या प्रसारासाठी नक्कीच होईल, असेदेखील सांगितले. 
एकूण 65 देशांतील 25क् बुद्धिबळपटूंचा सहभाग असलेली ही प्रतिष्ठेची स्पर्धा आगामी 5 ते 2क् ऑक्टोबर दरम्यान पुण्यात रंगणार आहे. शिवाय या स्पर्धेत ग्रँडमास्टर व इंटरनॅशनल मास्टर्स खेळाडूंचादेखील सहभाग असल्याने स्पर्धेची चुरस चांगलीच वाढली आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघ (फिडे) आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेली ही स्पर्धा खुला गट व मुलींचा गट अशा दोन प्रमुख गटांत पार पडेल. तसेच दोन्ही गटांतील विजेत्या खेळाडूंना सहा लाख रुपयांची रोख बक्षिसे व अनुक्रमे ग्रँडमास्टर व वुमन ग्रँडमास्टर असा किताबदेखील बहाल केला जाणार आहे. स्वीस लीग पद्धतीने होणा:या या स्पर्धेत एकूण 13 फे:या खेळविण्यात येणार असून, या वेळी सवरेत्तम कामगिरी करणा:या भारतीय खेळाडूला पुणो महापौर चषक देण्यात येईल. दरम्यान, या वेळी 666.61’Aि4ल्ल्र1ूँी222014.ूे या स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळाचे विश्वनाथन आनंदच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी) 
 
या स्पर्धेद्वारेच माझी कारकिर्द ख:या अर्थाने बहरली. त्यामुळे आज या स्पर्धेद्वारे बुद्धिबळ खेळाचा प्रसार करण्याचा आनंद मोठा आहे. जागतिक कुमार बुद्धिबळ स्पर्धेच्या माध्यमातूनच बोरीस स्पास्की, अनातोली कार्पोव्ह, गॅरी कास्पारोव्ह यांसारखे जागतिक विजेते खेळाडू उदयास आले. मलादेखील 1988मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतरच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली. यामुळेच युवा व उदयोन्मुख खेळाडूंना ही स्पर्धा सर्वार्थाने सुवर्णसंधी आहे. - विश्वनाथन आनंद, बुद्धिबळपटू
 
वर्ल्ड चॅम्पियनशिप ठरल्याप्रमाणोच होईल
च्विद्यमान चॅम्पियन मॅग्नस कार्लसन आणि माजी विजेता विश्वनाथन आनंद यांच्यात होणारे बुद्धिबळाचे विश्वयुद्ध ठरल्याप्रमाणो रशियातील सोची येथे नोव्हेंबर महिन्यात होईल, असा विश्वास आनंदने व्यक्त केला.
च्फिडेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आणि माजी विश्वविजेते गॅरी कास्पारोव्ह यांनी नुकतेच मी निवडून आल्यास वर्ल्ड चॅम्पियनशिप सामना मार्च 2015नंतरच होईल, असे म्हटले होते. याबाबत वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आनंद म्हणाला की, सोचीकडून आम्हाला ऑफर प्राप्त झाली आहे. सर्वकाही सुरळीत सुरू आहे. हा सामना रद्द करण्याबाबतचे कास्पारोव्हचे विधान म्हणजे निवडणूक प्रचाराचा एक भाग असू शकतो. 
च्आपल्या तयारीबाबत आनंद म्हणाला, माझी तयारी व्यवस्थित सुरू आहे. येत्या सप्टेंबरमध्ये बिलबाउमध्ये खेळणार आहे. नंतर ऑक्टोबरमध्ये जिनिव्हामध्ये रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा खेळणार आहे. या स्पर्धामुळे वर्ल्डचॅम्पियनशिपसाठी माजी चांगली तयारी होईल.