Join us
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांपासून रेशनिंगवर धान्य नाही

By admin | Updated: February 12, 2015 22:35 IST

केशरी कार्डधारकांना गेली चार महिने रेशन दुकानावर धान्य मिळत नाही, केशरी कार्डधारकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

कर्जत : केशरी कार्डधारकांना गेली चार महिने रेशन दुकानावर धान्य मिळत नाही, केशरी कार्डधारकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एक लाखाच्या खाली वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी कार्डधारकांना आता पांढऱ्या कार्डधारक यांच्यासारखे रेशन दुकानावर धान्य मिळणार नसेल तर जगायचे कसे? असा प्रश्न सामान्य लोकांसमोर उभा राहणार आहे. याला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. कर्जत येथील उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी राजेंद्र बोरकर यांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, राजिप जिल्हा परिषद उत्तम कोळंबे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक हनुमंत पिंगळे, उपतालुका प्रमुख दशरथ भगत, शशिकांत मोहिते, नगरसेवक संतोष पाटील, मुकेश पाटील, युवा सेना शहर अधिकारी संजय मोहिते, शहरप्रमुख भालचंद्र जोशी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी उपविभागीय अधिकारी बोरकर यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात चार महिन्यांपासून तालुक्यातील रेशन दुकानातील धान्य पुरवठा व रॉकेल पुरवठा थांबवण्यात आला असून तो अत्यंत निंदनीय, अन्यायकारक आहे, सर्वसामान्य जनता आज महागाई, बेकारी, आर्थिक मंदीत होरपळत असताना शासनाकडून अशा प्रकारच्या अन्यायाला कर्जत तालुका शिवसेना तीव्र विरोध करते आहे, असा प्रकार त्वरित थांबवावा अन्यथा शिवसेना सदनशीर मार्गाने आपल्या कार्यालासमोर धरणे आंदोलन करेल. तसेच एक महिन्यापासून रेशन दुकानातील रॉकेलचा पुरवठा चाळीस टक्के कमी केला आहे तो पूर्ववत करावा, तसेच केशरी कार्डधारकांना धान्य पुरवठा, रॉकेल पुरवठा तातडीने चालू करावा असे नमूद केले आहेतालुक्यात चार महिन्यांपासून रेशन दुकानावर केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नाही. का मिळत नाही, असा प्रश्न जिल्हाप्रमुख दिनेश पाटील यांनी उपस्थित केला. त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेले तहसीलदार रविंद्र बाविस्कर, पुरवठा अधिकारी दिनकर मोडक यांनी शासनाकडून धान्य येत नसल्यामुळे रेशन दुकानदारांना आणि पर्यायाने लाभार्थींना आम्ही धान्य देऊ शकत नाही, असे सांगितले. (वार्ताहर)