Join us

‘मरे’वर बम्बार्डियर धावण्यास अडचण नाही

By admin | Updated: August 26, 2015 02:03 IST

एमयूटीपी-२ अंतर्गत येणाऱ्या नव्या बम्बार्डियर लोकल तांत्रिक कारणास्तव मध्य रेल्वेवर नको, असा पवित्रा घेत त्या सर्व लोकल पश्चिम रेल्वेवर चालवण्यासाठी रेल्वे महाव्यवस्थापक

-  सुशांत मोरे,  मुंबईएमयूटीपी-२ अंतर्गत येणाऱ्या नव्या बम्बार्डियर लोकल तांत्रिक कारणास्तव मध्य रेल्वेवर नको, असा पवित्रा घेत त्या सर्व लोकल पश्चिम रेल्वेवर चालवण्यासाठी रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे जुन्याच लोकल मध्य रेल्वे प्रवाशांच्या वाट्याला येणार आहेत. मात्र बम्बार्डियर लोकल मध्य रेल्वेमार्गावर चालवण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचे रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एमआरव्हीसीमार्फत (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयूटीपी-२ अंतर्गत ७२ नव्या बम्बार्डियर लोकल उपनगरीय लोकल प्रवाशांच्या सेवेत आणण्याची योजना आखण्यात आली आहे. यातील तीन लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यात ४0 नव्या लोकल मध्य रेल्वेकडे तर उर्वरित ३२ लोकल पश्चिम रेल्वेकडे सोपवण्याची योजना होती. मात्र त्यात बदल करून रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सर्व ७२ नव्या लोकल पश्चिम रेल्वेवरच चालवण्याचा निर्णय घेतला. तर पश्चिम रेल्वेवर धावत असलेल्या सिमेन्स लोकल मध्य रेल्वेवर आणण्याचा निर्णय त्यांनी घेऊन एकच धक्का दिला. नव्या लोकल या मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर स्थिरावू शकणार नाहीत आणि त्यांच्यामुळे अनेक तांत्रिक समस्याही निर्माण होतील, अशी कारणे सूद यांच्याकडून पुढे करण्यात आली. याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त (मध्य रेल्वे) चेतन बक्षी यांना विचारले असता, बम्बार्डियर लोकल या सध्या पश्चिम रेल्वेवर उत्तमरीत्या धावत आहेत. आता तरी कोणतीही अडचण उद्भवलेली नाही. त्यामुळे मध्य रेल्वेमार्गावरही या लोकल धावण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. या लोकलच्या उंचीची समस्या असल्याची चर्चा आहे. मात्र मध्य रेल्वेमार्गावर तशी काही समस्या येईल, असे वाटतही नाही. पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या या लोकलच्या उंचीविषयी मध्य रेल्वेमार्गाशी तुलना केल्यास फक्त चार एमएमचा फरक पडत आहे, परंतु त्यात अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले. मरेवर नव्या लोकल नाहीनव्या लोकल मध्य रेल्वे प्रवाशांच्या वाट्याला येणार नसल्याने प्रवाशांमधून असंतोष व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांमधूनही याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.