दीडशे कोटींच्या आझमींकडे एकही कार नाही
By admin | Updated: September 28, 2014 22:29 IST
दीडशे कोटींच्या आझमींकडे एकही कार नाही
दीडशे कोटींच्या आझमींकडे एकही कार नाही
दीडशे कोटींच्या आझमींकडे एकही कार नाहीमुंबई: समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि मानखुर्द-शिवाजीनगर येथील सपाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभा निवडणुकीच्या अर्जामध्ये दीडशे कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. मात्र त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकही कार त्यांच्या नावावर दाखवलेली नाही. त्यामुळे इतकी संपत्ती असताना त्यांच्याकडे कार नसल्याने आर्य व्यक्त केले जात आहे. नेहमीच प्रकाशझोतात असलेले अबू आझमी यांनी २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भिवंडीसह मानखुर्द-शिवाजी नगर या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही जागेवर त्यांनी बाजी मारत विजय मिळवला होता. त्यानुसार या निवडणुकीत देखील त्यांनी मानखुर्द-शिवाजी नगरात शनिवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रांत त्यांच्या नावावर जंगम मालमत्ता १ अब्ज २३ कोटी,४९ लाख ६३ हजार ७२३ इतकी दाखवली आहे. तर स्थावर मालमत्ता १८ कोटी ९२ लाख २२ हजार अशी एकूण १ अब्ज ४२ कोटी ४१ लाख ८३ हजार ७२३ इतकी संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे १३ कोटी ६९ लाख २७ हजार २४१ इतकी मालमत्ता आहे. मात्र अबू आझमींच्या नावावर एकही कार नाही. (प्रतिनिधी)