Join us

पोलीस असूनही कारवाई नाही

By admin | Updated: December 4, 2014 23:56 IST

अंबरनाथ वडवली परिसरातील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळालेला असतांनाही अधिकारी मात्र कारवाई न करताच पुन्हा परतले. ए

अंबरनाथ : अंबरनाथ वडवली परिसरातील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळालेला असतांनाही अधिकारी मात्र कारवाई न करताच पुन्हा परतले. एका राजकीय पुढाऱ्याने कारवाई रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन केल्याने ही कारवाई झालेली नाही. राजकीय दबावाला बळी पडून पालिकेचे अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचे पुन्हा एकदा या कारवाईनिमित्त स्पष्ट झाले आहे. अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत असतांनाही पालिकेचे अधिकारी या अतिक्रमणांवर कारवाई करीत नाहीत. (प्रतिनिधी)