मोहोपाडा/रसायनी : उरण मतदार संघात एकूण सात उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. पनवेलमधून उरण मतदार संघाचे विभाजन झाल्यानंतरची ही दुसरीच निवडणूक असली तरी या बहुरंगी लढतीमुळे मतदार मात्र काहीसे संभ्रमात पडले आहेत. सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्यामुळे प्रत्येकाने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, मात्र आता प्रचारासाठी काहीच दिवस उरले असल्याने येत्या पंधरा दिवसात प्रचाराची रणधुमाळी पहायला मिळणार आहे.या मतदार संघातील सातही उमेदवारांना विजयाचा विश्वास वाटत आहे. प्रचंड शक्तिप्रदर्शन करत प्रत्येकाने आपले अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल केले, मात्र यामध्ये कोण बाजी मारेल हे सांगणे महाकठीण होवून बसले आहे. मागील निवडणुकीत शेकाप - शिवसेना - बीजेपी - आरपीआय यांची महायुती होती. त्यामुळे त्याचा फायदा शेकापच्या उमेदवाराला होवून त्यांनी प्रतिस्पर्धी आघाडीच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला होता. मात्र या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार उभे केल्याने यावेळी कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. मनोहर भोईर, काँग्रेसचे महेंद्र घरत, भाजपाचे महेश बालदी, मनसेचे अतुल भगत, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील तर उत्कर्ष समितीचे गोपाळ पाटील यांनी अर्ज दाखल करुन एकमेकांना आव्हान दिले आहे. (वार्ताहर)
उरण मतदार संघात बहुरंगी लढत
By admin | Updated: September 29, 2014 01:02 IST