Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' बोटीत कुणीही पाकिस्तानी खलाशी नाही, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची माहिती

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 1, 2023 21:43 IST

जलराणी ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. दोन वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबईमुंबई आणि पालघर किनारपट्टीपासून ४४ नौटीकल मैलावर तटरक्षक दलाने पकडलेल्या बोटीत कोणीही पाकिस्तानी खलाशी नाहीत. हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कॉलासो यांनी दिली. या बोटीला अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी फोन करून लोकमतला ही माहिती दिली..

सदर जलराणी ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. दोन वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आज सकाळी ही बोट तटरक्षक दलाच्या जवानांनी त्यात पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयावरून पकडली होती. मात्र यातील सर्वच्या सर्व पंधरा खलाशांची आधार कार्ड आमच्याकडे असून त्यात कोणीही पाकिस्तानी नागरिक नाही, असे कोलासो यांनी सांगितले.

सदरची बोट ही मासेमारीसाठी गेली असून ती संपर्काबाहेर असल्याने तिच्या अलीकडे असणाऱ्या निर्गम या बोटीवरून जलराणी बोटिशी संपर्क साधण्यात आला. उत्तन किनारी तिने परतावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत असे त्यांनी सांगितले

ही बोट मासेमारीसाठी सुमारे साडेचार किलोमीटर क्षेत्रात जाळे टाकून असल्याने ते गुंडाळून घ्यायला पाच तास आणि परत येण्यासाठी किमान दोन आणखी तास लागतील, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईमच्छीमार