Join us

जिल्ह्यातील साडेचार लाख मतदारांचा ठावठिकाणाच नाही

By admin | Updated: September 25, 2014 00:09 IST

दुबार नावे असलेल्या, मयत झालेल्या, घर सोडून गेलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळ्यापूर्वी त्यांना सूचित करणे अपेक्षित आहे.

ठाणे : दुबार नावे असलेल्या, मयत झालेल्या, घर सोडून गेलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळ्यापूर्वी त्यांना सूचित करणे अपेक्षित आहे. यासाठी वृत्तपत्रांमध्ये रीतसर जाहिरात देऊन मतदारांना स्पीड पोस्टने पत्रं पाठवण्यात आली. परंतु, पाठवलेल्या सुमारे पाच लाख ८८ हजार पत्रांपैकी तब्बल चार लाख ५१ हजार पत्रं निवडणूक आयोगाला परत आल्याचे उघड झाले आहे.विधानसभा निवडणुकीसाठी नावे मतदार यादीतून वगळण्याचा कार्यक्रम हाती घेतला नाही. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार याद्या पुनर्परीक्षण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. नावे वगळण्यापूर्वी मतदारांना सूचित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील पाच लाख ८८ हजार मतदारांना त्यांच्या राहत्या घराच्या पत्त्यावर पत्रे पाठवण्याचे कर्तव्य आयोगाने पार पाडले. परंतु, तेथे संबंधित मतदार राहत नसल्याने चार लाख ५१ हजार पत्रे परत आली आहेत. (प्रतिनिधी)