Join us
Daily Top 2Weekly Top 5

...तर २९ एप्रिलपासून करणार काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:06 IST

सरकारी रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारी रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) आपल्या विविध ...

सरकारी रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सरकारी रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही, तर २९ एप्रिलपासून कंत्राटी वैद्यकीय अधिकारी काम बंद आंदोलन सुरू करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने दिला.

राज्यातील १९ सरकारी रुग्णालयांत ४०० ते ४५० कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, डॉक्टर आहेत. ते कॊरोना काळात गेले वर्षभर झाली सेवा देत आहेत. या डॉक्टरांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी वर्षभरापासून करण्यात येत आहे. याशिवाय वेतननिश्चिती आणि इतर भत्ते मिळावेत, अशीही त्यांची मागणी आहे. अशा विविध मागण्यांसाठी सर्वस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. यासाठी आंदोलनेही केली आहेत. मात्र, केवळ कोरडी आश्वासने मिळत असल्याची खंत व्यक्त करून आता या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

* १५ दिवसांनंतरही कार्यवाही नाही

कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी कंत्राटी डॉक्टरांनी १५ एप्रिलला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर ठोस निर्णय घेतला न गेल्यास २९ एप्रिलपासून कामबंद आंदोलनावर जाण्याचा निर्धार या डॉक्टरांनी केला आहे.

..........................