Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘...तर पाकिस्तान, बांगलादेशात हिंदू शिल्लक राहणार नाहीत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 07:55 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते

मुंबई : बांगलादेशात अनेक वर्षे वास्तव्यास असणारे हिंदू आज अल्पसंख्याक आहेत. तेथे त्यांच्या कल्याणार्थ कायदे राबविण्याऐवजी अधिक कठोर निर्बंध लादले जातात. भारताला संयुक्त राष्ट्र संघात दोन वर्षांसाठी सदस्यत्व मिळाले आहे. या काळात हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा भविष्यात पाकिस्तानबांगलादेशातहिंदू शिल्लक राहणार नाहीत, असे मत निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले. 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते. ते म्हणाले की बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार लक्षात घेता चीन सातत्याने भारताच्या विरोधात भूमिका घेतो. त्यासाठी हे प्रश्न मानवी हक्क अधिकारात तसेच संयुक्त राष्ट्र संघात मांडणे गरजेचे आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे सुंदरबनसारखा परिसर पाण्याखाली गेल्यास तेथील लोक स्थलांतर करतील. ही घुसखोरी समुद्री मार्गाने पूर्वेकडील ओरिसा आणि पश्चिम बंगालमधूनही होईल. कितीही प्रयत्न केल्यास भारताला हे स्थलांतर थांबवणे शक्य नाही. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा फटका आपल्याला बसणारच असेही ते म्हणाले.

टॅग्स :पाकिस्तानबांगलादेशहिंदू