Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरातले झोपेत असताना चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:07 IST

मुंबई : दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे पाहून गोवंडी परिसरात रविवारी पहाटे चोरट्याने घरात शिरकाव केला. घरात सर्व गाढ झोपेत ...

मुंबई : दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे पाहून गोवंडी परिसरात रविवारी पहाटे चोरट्याने घरात शिरकाव केला. घरात सर्व गाढ झोपेत असल्याचा फायदा घेऊन ताे मोबाईल चोरून पळून जाण्याच्या तयारीत असताना, घरातील मंडळींना जाग आली. त्यांनी चोराच्या मुसक्या आवळून शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. आकिब सैराब खान असे चाेरट्याचे नाव आहे.

................................................................

सुरक्षारक्षकाच्या खात्यातून पैसे गायब

मुंबई : माटुंगा येथील एका वृद्धाश्रमाबाहेर सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ३३ वर्षीय राजेश कुमार बाबूलाल यांचे एटीएम कार्ड चोरी करून ४७ हजार ५०० रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नुकताच माटुंगा पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

.......................................................

गुंतवणुकीच्या नावाखाली विद्यार्थिनीला गंडा

मुंबई : सोशल मीडियावरून ओळख झालेल्या तरुणाच्या सांगण्यावरून शेअर मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करणे विद्यार्थिनीला महागात पडले. यात तिची १५ हजार रुपयांना फसवणूक झाली आहे. याप्रकरणी रविवारी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

................................